Free home delivery at your doorstep For Above   500

  • Call us: 9022700360

हॉटेल निखारा

हॉटेल निखारा, नाव वाचल्यानंतर आपल्याला काही तरी वेगळं वाटेल. पण आम्ही आपल्याला एक अनोखी चव चाखण्यासाठी आमंत्रित करीत आहोत. पुण्यात किंवा आसपास तुम्ही अनेक हॉटेलमध्ये मटणाची चव चाखली असेल पण ज्यावेळी तुम्ही आमच्या हॉटेल निखारा येथे भेट द्याल, त्यावेळी तुम्हाला नक्कीच असे वाटेल कि, अरे अशी चव यापूर्वी आपल्याला का घेता आली नाही ?

मित्रहो, ज्यावेळी तुम्ही सिंहगडावर जाण्यासाठी निघाल, संध्याकाळच्या रम्य वातावरणात खडकवासला धरणावर, वरसगाव धरण, पानशेतच्या धरणावर आपल्या कुटुंबियासोबत, मित्रांसोबत फिरायला जाल किंवा फिरून येत असाल त्यावेळी तुम्हाला दुसरीकडे कुठेही जेवणासाठी थांबण्याची आवश्यकता नाही. त्यावेळी तुमच्या नजरेसमोर एकच नाव दिसेल, ते म्हणजे हॉटेल निखारा. तुम्ही आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी मटण, चिकन जेवला असणार, पण ज्यावेळी तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये याल तेव्हा तुम्हाला चुलीवरच्या मटणाची चव आणि मजा काय असते याची अनुभूती येईल.

कारण आम्ही जे जेवण बनवतो ते दगडाच्या चुलीवर आणि चुलीवर बनविलेल्या मटणाची लज्जत काही और असते हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आता आम्ही एवढं सांगितल्यावर तुमची उत्सुकताही वाढल्याशिवाय राहणार नाही.

नांदेड सिटीच्या भव्य गेटसमोर, धायरी, वडगाव, नर्हे, आंबेगाव तसेच पुणे शहरातून येणाऱ्या असंख्य लोकांसाठी हॉटेल निखाराचा अनुभव घेतल्यावाचून चैन पडणार नाही.

ज्यावेळी तुम्ही आमच्या हॉटेलला भेट द्याल त्यावेळी तुम्हाला सुंदर असे वातावरण पाहायला मिळेल. उत्कृष्ट कूकच्या हातून तयार झालेले मटण आणि चांगली सेवा देण्याचा आमचा मानस आहे. एका निसर्गिकरित्या तयार केलेल्या हॉटेलमध्ये बसून, त्यातही मटणावर ताव मारून, समाधानाची ढेकर देऊन आणि तृप्त होऊन तुम्ही परत परत आमच्या हॉटेल निखाऱ्याला भेट देणार आणि आपल्या सर्व मित्र परिवारालाही जेवन्यासाठी घेऊन येणार याची आम्हाला खात्री आहे .

© 2019 Hotel Nikhara. All rights reserved | Design & Developed by Scrambler Technosys Pvt. Ltd